कथेपलीकडचा चित्रपट
- Suhas Kirloskar | suhass.kirloskar@gmail.com
The Voyage of Colorfilm
In 1901, the first color movie was created. As time went by, the production of color films in the year 1905 started using six colors. Later on, the introduction of Technicolor in 1915 was seen as a turning point for color movies.
Dadasaheb Torane created a 22-minute film called “Shri Pundalik” in 1912. Later, Dadasaheb Phalke created India’s first full-length dialogue, ‘Raja Harishchandra,’ in 1913. As years went by, A. Irani produced and directed the first talkie, ‘Alam Ara,’ in 1931. ‘Prabhat’ produced the first color film “Sairandhri” in the same year. V. Shantaram directed this movie and it was processed in Germany. Finally in the year, 1937, with Manto’s written screenplay, India witnessed its very own color film.
Technicolor films were extremely expensive to make. Eastman Kodak came up with a comparatively low-cost alternative. It came to be known as ‘Eastmancolor’. The first Indian Eastmancolor film was ‘Hum Hindustani’ (1961). But the first film to use the Eastmancolor method wholly in India was ‘Jungli’ (1961). You may remember that in the names of numerous films, such as ‘Karwaan,’ ‘Tisari Manzeel,’ and ‘Amar Akbar Anthony,’ the word ‘Eastmancolor’ appears before the title.
It became crucial to consider how the film director, art director, production designer, and cinematographer used the colors after the introduction of color films. The color of the film ‘Hum Dil De Chuke Sanam’ is similar to Rajasthani red. Each of Sanjay Leela Bhansali’s films has distinct color expertise. By looking at the film from the perspective of different shades of the ‘color palette’, the concept of the film and the colors in the picture can be merged. Film Beyond Story is a magazine dedicated to the art of filmmaking.
चित्रपट कलेचा रसास्वाद घेणारी लेखमाला
घोडा पळताना काही क्षण त्याचे चारही पाय हवेत असतात का? १४० वर्षांपूर्वी म्हणजे १८७८ साली एडवर्ड मेब्रीजने (Eadweard Muybridge) हे सिद्ध करेपर्यंत यावर कोणाचा विश्वास नव्हता. एडवर्डने एकामागोमाग फोटो काढून त्याच क्रमाने सर्व फोटो वेगाने बघण्याचा प्रयत्न केला, ही पहिली शॉर्ट फिल्म. त्या पहिल्या शॉर्ट-फिल्ममध्ये घोडेस्वार घोडा पळवताना दिसलाच, शिवाय एका क्षणी घोड्याचे दोन्ही पाय हवेत असतात हे सिद्ध झाले आणि एडवर्डने पैज जिंकली. मोशन पिक्चर्सची सुरुवात अशा प्रकारे एक पैज लावण्यामुळे झाली. कालांतराने तंत्रज्ञान प्रगत होत गेले, मूकपटापासून बोलपट तयार झाले.
१९०१ साली पहिली कलर फिल्म बनवण्यात आली. १९०५ साली सहा रंगांचा वापर करून रंगीत फिल्म तयार केली गेली. १९१५ साली ‘टेक्निकलर’चा जन्म झाला, जो रंगीत चित्रपटांच्या दृष्टीने मैलाचा दगड मानला जातो. अभियंता-संशोधक हबर्ट कॅलमस (Herbert Kalmus) यांनी १९३२ साली वॉल्ट डिस्ने यांची भेट घेतली आणि ‘थ्री स्ट्रीप कलर प्रोसेस’चा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार तयार झालेली फिल्म ‘फ्लॉवर्स अँड ट्रीज’ वॉल्ट डिस्ने यांनी या तंत्राचा वापर करून ‘मिकी माउस’ शोर्ट फिल्म तयार केल्या. ३५ एम.एम. फिल्मवर एक ब्लॅक अँड व्हाईट, एक निळी आणि एक लाल अशा तीन स्ट्रीपने अनेक रंग तयार करून ‘टेक्निकलर’ फिल्म बनवण्याचा प्रस्ताव मान्य झाला.
Becky Sharp, Dancing Pirate, The Garden of Allah, Ramona सारख्या चित्रपटानंतर १९३७ साली रिलीज झालेला वॉल्ट डिस्ने यांचा ‘Snow white & Seven dwarfs’ गाजलेला ‘टेक्निकलर’ चित्रपट. १९४१ साली ‘सिटीझन केन’ हा ‘क्लासिक’ चित्रपट ‘ब्लॅक अँड व्हाईट’ मध्येच रिलीज झाला, तोपर्यंत रंगांचा वापर चित्रपटात उत्तमरीत्या केला गेला नव्हता आणि ‘टेक्निकलर’ मध्येच चित्रपट तयार केले जायचे. तीन स्ट्रीपऐवजी ‘इस्टमनकलर’ द्वारे एकाच स्ट्रीपमधून रंगीत चित्रपट तयार करण्याची पद्धत हॉलीवूडमधल्या बऱ्याच स्टुडियोनी १९५२ साली अंगिकारली.
भारतामध्ये दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला पूर्ण लांबीचा बोलपट तयार केला. तत्पूर्वी दादासाहेब तोरणे यांनी “श्री पुंडलिक” ही २२ मिनिटांची फिल्म १९१२ साली बनवली होती. १९३१ साली अर्देशीर इराणी निर्मित-दिग्दर्शित ‘आलम आरा’ हा पहिला बोलपट तयार झाला. त्याचवर्षी व्ही शांताराम दिग्दर्शित ‘सैरंध्री’ हा पहिला रंगीत चित्रपट ‘प्रभात’ ने तयार केला, ज्याचे प्रोसेसिंग जर्मनीमध्ये झाले होते. ‘किसान कन्या’ (१९३७) हा पूर्णपणे भारतात तयार केलेला पहिला रंगीत चित्रपट, ज्याची पटकथा मंटो यांनी लिहिली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तयार केलेल्या रंगीत चित्रपटात मेहबूब खान दिग्दर्शित ‘आन’ आणि सोहराब मोदी यांचा ‘झांसी की रानी’ हे चित्रपट प्रथमतः तयार केले. त्यानंतर ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५), ‘मदर इंडिया’ (१९५७), ‘नवरंग’ (१९५९) हे चित्रपट उल्लेखनीय रंगीत चित्रपट तयार झाले. तरीही हे चित्रपट, तंत्राचा वापर करून रंगीत केलेले होते. ‘गंगा जमुना’ हा पूर्णपणे ‘टेक्निकलर’ तंत्रानुसार तयार केलेला पहिला चित्रपट. ‘मुघल ए आझम’ (१९६१) चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे रंगीत बघितल्याचे रसिकांना आठवत असेलच.
‘टेक्निकलर’ चित्रपट तयार करणे फारच खर्चिक होते. त्यावर इस्टमन कोडॅक यांनी त्याकरिता तुलनेने कमी खर्चाचा उपाय काढला ज्याला ‘इस्टमनकलर’ या नावाने संबोधण्यास सुरुवात झाली. ‘हम हिंदुस्थानी’ (१९६१) हा पहिला भारतीय इस्टमनकलर चित्रपट आहे आणि ‘जंगली’ (१९६१) चित्रपटात पहिल्यांदा इस्टमनकलर तंत्राचा वापर संपूर्णपणे भारतात केला गेला. ‘कारवाँ’, ‘तिसरी मंझील’, ‘अमर अकबर अंथोनी’ सारख्या अनेक चित्रपटांच्या टायटल्समध्ये चित्रपटाच्या नावाखाली ‘Eastmancolor’ असे वाचल्याचे आठवत असेल. हॉलीवूडमध्ये तयार झालेल्या अनेक टेक्निकलर चित्रपटांचे मूळ तंत्र इस्टमनकलरच होते. त्यानंतर ‘कोडॅक’चा स्पर्धक असलेल्या फ्युजी फिल्म्सने रंगीत चित्रपटात १९८० पासून नवे ‘रंग भरले’ आणि १९८३ साली सावनकुमार दिग्दर्शित ‘सौतन’ हा पहिला फ्युजी कलरने तयार केलेला भारतीय रंगीत चित्रपट रिलीज झाला. मूक चित्रपट बोलू लागल्यानंतर चित्रपटांचे जग ‘सात रंग के सपने’ घेऊन आले; त्या प्रवासाचा हा अगदी धावता आढावा.
चित्रपट रंगीत झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, प्रोडक्शन डिझायनर, सिनेमटोग्राफर यांनी रंगांचा वापर कसा केला, हे महत्वाचे आहे. आता सर्वच चित्रपट रंगीत असले तरीही प्रत्येक चित्रपटात प्रामुख्याने वापरलेला रंग वेगळा असतो. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा रंग राजस्थानी लाल रंगाच्या जवळपास जाणारा आहे. संजय लीला भन्साळी यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळ्या रंगाचे प्रभुत्व दिसते. ‘देवदास’ चित्रपटामध्ये बिनोद प्रधान यांची सिनेमटोग्राफी, नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि नीता लुल्ला यांनी केलेली वेशभूषा एका रंगाशी मेळ खाणारी होती. ‘सावरिया’ चित्रपटामध्ये निळ्या रंगाची नवलाई होती. ‘ब्लॅक’ चित्रपटात काळ्या आणि निळ्या रंगाचे प्रभुत्व होते. यश चोप्रा यांच्या ‘चांदनी’ चित्रपटामध्ये श्रीदेवी ने नेसलेली पिवळ्या रंगाची भडक साडी आपल्याला आठवत असेल. अमेरिकन ब्युटी’’, ‘द एव्हिएटर’ सारख्या चित्रपटात रंगांचा वापर आवश्यक तेवढाच केला आहे परंतु लाल रंग विशिष्ट प्रसंगामध्ये प्रभावीपणे दाखवला आहे, कारण चित्रपटातील प्रसंग तसा आहे. फोटो काढताना कॅमेऱ्यात ज्याप्रमाणे रंग गडद दिसू नयेत यासाठी सेटिंगमध्ये जसे बदल करता येतात त्याचप्रमाणे चित्रपटाच्या कॅमेऱ्यातही बदल करता येतात. परंतु यातले बरेचसे काम प्रामुख्याने शुटींग पूर्ण झाल्यानंतर केले जाते.
‘कलर पॅलेट’च्या विविध शेड्सच्या दृष्टीकोनातून चित्रपट बघितल्यावर चित्रपटाचा विषय आणि चित्रपटातील रंग यांची सांगड घालता येते. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ चित्रपटाचा रंग मातीच्या रंगाशी मिळताजुळता होता. चित्रपटाची कथा हरियाणामधील छोट्या गावामध्ये घडते त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या भागात मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर पुरुष पांढऱ्या कपड्यात दाखवले आहेत. स्त्रिया रंगीत कपड्यामध्ये दाखवल्या असल्या तरीही ते रंग भडक पद्धतीने दाखवले जाणार नाहीत याची काळजी घेतली होती. स्टीव्हन स्पिलबर्गच्या ‘द रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क’ चित्रपटातील रंग माती, फर्निचर, पुरातन कालीन जुन्या वस्तू यांच्या रंगाशी मिळतेजुळते आहेत.
कलर कॉन्ट्रास्ट म्हणजे रंगांच्या गडदपणातील फरक. चित्रातील काही रंग गडद केल्यास त्या चित्राचा परिणाम वेगळा होतो. रंगांमधील परस्पर विरोध आल्फ्रेड हिचकॉकने ‘व्हर्टीगो’ चित्रपटात अनोख्या पद्धतीने दाखवले आहेत, ज्याचे सुतोवाच चित्रपटाच्या टायटल्समध्येच केले आहे. चित्रपटातील सुरुवातीच्या प्रसंगामध्ये नायिकेचा स्कर्ट, नायकाचा टाय, टेबलावर ठेवलेल्या वस्तू, तबक एवढेच नव्हे तर नायिकेच्या हातातील पेन्सिलसुद्धा निळ्या रंगाची आहे.
‘परिंदा’ चित्रपटात नायक अनिल कपूर आणि नायिका माधुरी दिक्षित यांचे अव्यक्त प्रेम दाखवताना दोघांच्या वेशभूषेचा रंग पिवळा आहे. ‘तुमसे मिल के ऐसा लगा’ या गाण्यात दोघांचे सूर जुळले आहेत आणि वेशभूषासुद्धा. ‘प्यार के मोड पे छोडोगे जो बाहे मेरी’ या गाण्यामध्ये पार्श्वभूमी सायंकाळच्या प्रकाशाची आहे, माधुरी दिक्षितचा ड्रेस पांढऱ्या रंगाचा आहे, त्यावर केशरी रंगाची ओढणी आहे परंतु नायक (?) अनिलकपूरचा वेश काळ्या रंगाचा आहे कारण तो खलनायकाच्या गँगमध्ये सामील होतो. पुकार चित्रपटातील ‘के सेरा सेरा’ गाण्यात पार्श्वभूमी गडद लाल रंगाची आहे आणि माधुरी दिक्षितसह स्टेजवरील नृत्य करणारे काळ्या कपड्यात आहेत. कारण नायिका (?) नायकाला आपलेसे करण्यासाठी पुढे काय करणार आहे याचे सुतोवाच या गाण्यात आहे, ‘फिर चाहे जो हो!’.
अँग ली दिग्दर्शित ‘लाईफ ऑफ पाय’ सारख्या अनेक चित्रपटात अत्यंत भडक रंग प्रयोगशील पद्धतीने वापरले आहेत पांढऱ्या रंगाची बोट आतमधून लाल रंगाने रंगवली आहे. कला दिग्दर्शक अल हॉब्ज यांनी प्रत्येक दृश्य जणू काही स्वप्न दृश्य वाटावे असे चित्रीत केले आहे. याचे कारण इरफान खान याने शेवटी सांगितलेल्या उत्तरात आहे. ख्रिस्तोफर नोलानचा ‘डंकर्क’ तीन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून दाखवला आहे. प्रत्येक दृष्टीकोनाच्या (Point of view) वेळा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. जमिनीवर जे घडते ते पांढऱ्या रंगामध्ये, समुद्रामध्ये जे घडते ते गडद निळ्या रंगामध्ये आणि आकाशात जे घडते ते आकाशी निळ्या रंगात. जरी या घटना थोड्याफार फरकाने एकमेकात गुंतलेल्या असल्या मुळे या रंगामध्ये गडद रेषा ओढलेली नसली तरीही प्रत्येक टाईमलाईन बारकाईने बघितल्यास फरक जाणवतो.
रंगांची उधळण कोणत्या चित्रपटात अनोख्या पद्धतीने झाली आहे, त्याबद्दल पुढील लेखामध्ये.
Leave a Reply